
बातमी कट्टा:- अमळनेर येथील 23 वर्षीय युवकाचा धुळे तालुक्यातील अंबोडे गावाजवळ गुरुवारी सायंकाळी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.सदर युवकाला पोटावर, पाठीवर तोंडावर तिक्ष्ण हत्याराचे वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.अखेर पोलीसांनी मयत युवकाची ओळख पटवून खून करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील अंबोडे शिवारातील एका अनोळखी पुरुषाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आला होता.याबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशनात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.धुळे तालुका पोलीसांच्या पथकाने मयत युवकाची ओळख पटवली असता मयत युवक अमळनेर तालुक्यातील रणाईचे तांडा येथील ज्ञानेश्वर रामभाऊ राठोड असल्याचे उघड झाले.मयत ज्ञानेश्वर राठोड याच्या पोटावर, पाठीवर तोंडावर तिक्ष्ण हत्याराचे वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.याबाबत धुळे तालुका पोलीसांकडून संशयीत जगदीश बबलु राठोड रा.रणाईचे तांडा ता अमळनेर जि.धुळे याला ताब्यात घेत चौकशी केली असता.अनैतिक संबंधाचे कारणावरून मयत ज्ञानेश्वर राठोड याला मोटरसायकलीने आणून अंबोडे शिवारात चाकूने वार करत खून केल्याचे संशयित जगदीश राठोड याने कबुली दिली.
धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पथकाने 24 तासातच संशयिताचा शोध घेत अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल महाजन,सागर काळे,सुनिल विंचुरकर, प्रशिण पाटील, सोमनाथ कांबळे,योगेश पाटील, प्रमोद पाटील, धिरज सांगळे,कुणाल शिंगाणे,नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ,राकेश मोरे योगेश पाटील, विशाल गुरव आदींनी कारवाई केली आहे.