क्या बात है ! शेतकऱ्याला पहिल्याच प्रयोगात मिळाले टरबूजचे ७ लाखांचे विक्रमी उत्पन्न,

बातमी कट्टा:- धुळे तालुक्यातील कापडणे येथील शेतकऱ्याने सतत पालेभाज्या पिकांमध्ये येत असलेल्या अपयशाला कंटाळून चार एकरात टरबूज लागवडीचा पहिलाच प्रयोग केला. व या पहिल्याच प्रयोगात या शेतकऱ्याने चार एकरात टरबुजचे सात लाखाचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. पहिल्याच प्रयोगात यशस्वीपणे टरबूज पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे परिसरात कौतुक होत आहे.


कापडणे येथील शेतकरी कैलास नवल बडगुजर यांनी आपल्या शेतात हिंमतीच्या जोरावर सव्वा दोन महिन्यात सात लाखाचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. कैलास बडगुजर हे शेतकरी पालेभाज्या उत्पादक शेतकरी म्हणून परिचित आहेत.मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कधी नफा तर कधी जास्तीचा तोटा त्यांना येत होता. अखेर शेतात काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेत बडगुजर यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात सव्वा दोन महिन्यांपूर्वी टरबूज लागवड केली.

कष्ट, जिद्द, मेहनत व अचूक नियोजनाच्या जोरावर टरबूज बाग फुलवली. अतिशय आकर्षक असलेल्या या टरबूजला मोठ्या शहरांमधून मागणी होत आहे.
बडगुजर यांनी पहिल्याच प्रयत्नांत केलेल्या विक्रमी उत्पन्नाची परिसरात चर्चा सुरू आहे. बडगुजर यांनी यशस्वी टरबूज बाग फुलवण्यासाठी बेड तयार करणे, मल्चिंग पेपर टाकणे, स्पेशल डोस खते, योग्य फवारणी, खते, ठिबकद्वारे पाणी असा एकूण मजुरीसह दोन लाख रुपये खर्च केले.

WhatsApp
Follow by Email
error: