बातमी कट्टा:- तालुक्यातील खर्दे येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 9 ऑगस्ट क्रांती दिन विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
यावेळी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.या दिनाचे औचित्य साधून देशभक्तिपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात विद्यालयातील एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.याप्रसंगी पी एस अटकाळे,पी बी धायबर,बी एस बडगुजर,डी एम पवार,अमोल सोनवणे,भरतसिंग पावरा,श्रीमती सुनीता सूर्यवंशी ,सुनंदा निकम, सीमा जाधव, मनीषा पाटील आदी उपस्थित होते.यावेळी पी आर साळुंखे व ए जे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन सीमा जाधव तर आभार प्रदर्शन अमोल सोनवणे यांनी केले.देशभक्तिपर गीत गायन स्पर्धेमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. प्रथम पारधी पुजा विनोद, द्वितीय महाजन कार्तिक कन्हैया, तृतीय चौधरी सुनिता रविंद्र ,खोंडे उन्नती रवींद्र असे क्रमांक प्राप्त केले.