खून केल्यानंतर महिलेला तापी नदीपात्रात टाकल्याचे अहवालात स्पष्ट…

बातमी कट्टा:- सात महिन्यांपूर्वी तापी नदीपात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता याबाबत चौकशीसह उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारींकडून प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवाल व प्रयोगशाळेच्या अहवालानुसार महिलेचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील तापी नदीपात्रात 35 ते 40 वयोगटातील अनोळखी महिलेचा दि 2 जानेवारी रोजी मृतदेह आढळला होता.या बाबत पोलीसांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन शवविच्छेदन करण्यात आले होते.याबाबत आता सात महिन्यानंतर शवविच्छेदनचा अहवालचा अहवाल प्राप्त झालेला आहे.त्या अनोळखी महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह नदीपात्रात टाकल्याचे चौकशी अहवालात समोर आले आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: