बातमी कट्टा:- जैतोबा देवाच्या यात्रेत हाणामारीत खून करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. हाणामारीत मृत्यू नंतर संशयित विरुद्ध खूनाचा गुन्ह्याचा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल नंतर संशयित फरार होता.
दि 9 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे जैतोबा देवाच्या यात्रेत झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाला होता.त्यावरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशनात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा खून धुळे तालुक्यातील चितोड येथील गोकुळ श्रावण अहिरे याने केल्याचे उघड झाले होते.त्याचा शोध सुरु असतांना धुळे तालुका पोलीसांनी सापळा रचत संशयित गोकुळ अहिरे याला ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपहनिरीक्षक असई विंचूरकर,प्रविण पाटील,मुकेश पवार,धिरज सांगळे,कुणाल शिंगाणे,नितीन दिवसे,कांतीलाल शिरसाठ,राकेश मोरे आदींनी कारवाई केली आहे.