बातमी कट्टा:- गणेश विसर्जनासाठी गेलेल्या 29 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दि 9 रोजीच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदखेडा येथे राहणारा राकेश अशोक आव्हाड वय 29 हा दि 9 रोजी घरातील गणेश विसर्जनासाठी शिवारातील पांझरा नदीवर गेला होता.गणेश विसर्जनादरम्यान राकेशचा तोल गेल्याने तो पांझरा नदीतील सिमेंट पाईपा जवळ पडला.त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो वाहून गेला शोधाशोध सुरु असतांना पाईपाच्या दुसऱ्या बाजुने राकेश बेशुद्ध अवस्थेत बाहेर पाण्यात वाहत आला.त्याला तात्काळ उपस्थितांनी बाहेर काढून उपचारासाठी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.घटनेनंतर राकेशच्या कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला.घटना सर्वत्र पसरताच आनंदखेडा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.राकेश याचे इलेक्ट्रीक इंजिनिअरींगचे शिक्षण झाले होते.