बातमी कट्टा:- राहत्या घरी गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना काल दि 6 जून रोजी घडली असून कर्जपणामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे येथील प्रेमसिंग जगतसिंग राजपूत यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 6 रोजी उघडकी आली आहे. प्रेमसिंग राजपूत यांच्या मोठ्या प्रमाणात कर्ज होते.त्यात दुष्काळ व नापिकी मुळे ते त्रस्त होते यामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात तीन भाऊ,तीन मुली,पत्नी,आई असा परिवार होत.