
बातमी कट्टा:- गांजाची तष्करी करतांना दोन जणांना पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे त्यांच्या ताब्यातून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.मिथुनकडून मुंबईच्या लेस्टर डिसुजा याने हा गांजा खरेदी करणार असल्याचे या कारवाईत उघड झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 26 रोजी शिरपूर शहर पोलीसांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिल्याने पोलीस पथक मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाटा येथे सापळा रचून उभे असतांना यावेळी पुलाखाली एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकलवर दोन तरुण जातांना पोलीसांशी शिताफीने त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यानचे नाव मिथुन जवल्या पावरा वय 29 रा.उमरदा ता.शिरपूर व लेस्टर अँथोनी डिसुजा वय 37 लोचरगाव मलाड वेस्ट मुंबई असे सांगितले त्यांच्या कडील बॅगची झडती घेतली असता त्यांच्याकडे 83 हजार 100 रुपये किनमतीचा 10 किलो गांजा मिळुन आला.शिरपूर पोलीसांनी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.यात संशयित मिथून याच्या कडून संशयित लेस्टर डिसुजा गांजा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख सपोनि गणेश फड,पोसई संदिप मुरकुटे, नरेंद्र शिंदे,स्वप्निल बांगर,अमित रनमळे,भुषण कोळी आदींनी केली आहे.
