
बातमी कट्टा:- तरुणाचा गावाजवळील शेतातील झाडाझुडुपांमध्ये मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना काल दि १७ रोजी सकाळी उघडकीस आली होती. मयत तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणी पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे गावातील दिपक रतीलाल मालचे वय २५ या तरुणाचा गावाजवळील शेतात मृतदेह आढळून आला होता.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पथक दाखल झाले होते.याप्रकरणी मयत दिपक मालचे याचे वडील रतीलाल मालचे यांनी शिंदखेडा पोलिस स्टेशनात दिलेल्या फिर्यादी दिली आहे.
याबाबत फिर्यादी रतीलाल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि दिपक मालचे हा विवाहित होता त्याला ताडी पिण्याचे व्यसन लागले होते.दिपकचे गावातील एका महिलेसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.दि १७ रोजी दिपक मालचे याचा गावाजवळील शेतात मृतदेह आढळून आल्यानंतर दिपकचे ज्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते त्या महिले जवळ चौकशी केली तेव्हा तीने सांगितले की दिपक मालचे नशेत होता त्याने दि १६ रोजी रात्री तीला गावाजवळील शेतात बोलवले.तेथे दोघांमध्ये वाद झाला दोघांमध्ये हाताबुक्यांनी मारहाण झाली आणि वादातून महिलेने दिपक मालचे याला मारहाण करतांना दिपक मालचे बेशुद्ध झाला.घाबरून महिला शेतातून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी तात्काळ संशयित महिलेला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून याप्रकरणी चौकशी सुरु आहे.