गुजरात राज्यातून रात्रीच्या सुमारास धुळ्यात वाहतूक होत असतांना पोलीसांची धडक कारवाई,39 लाखांचा मुद्देमाल जप्त..

बातमी कट्टा:- गुजरात राज्यातून विमल पानमसालाची पिकअप वाहनातून वहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पिंपळनेर पोलीसांनी रात्रीच्या सुमारास सापळा रचून पिकअप वाहन ईनोव्हा कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे.यात दोन संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे सचिन साळुंखे यांच्या सह विशाल मोहने,मकरंद पाटील व रविंद्र सुर्यवंशी आदींनी सामोडे चौफुली येथे सापळा लावुन थांबले असता रात्री 9 वाजेच्या सुमारास एम.एच.46 बी.बी.0173 क्रमांकाची पिकअप वाहन येतांना दिसली पोलीसांनी त्या वाहनाला थांबवले असता चालकाला विचारपूस केली चालक नासीरखान हयात खान चाळीगाव रोड धुळे याने सांगितले की पिकअप मध्ये विमल नावाचा सुगंधीत पान मसाला असून सदर माल हा धुळे येथील नाना विठ्ठल साबळे व अमोल मोरे यांच्या सांगण्यावरून जुबेर अन्सारी,वसीम अन्सारी,सोनु विधाते,नटराज टॉकीज जवळ धुळे व सचिन जिवन मुर्द्दाळकर,प्रियकिर्ती राजु पगारे यांच्या सोबत गुजरात राज्यातुन विकत घेऊन धुळे कडे जात होते.चालक नासीरखान हा पिक अप चालवून आणत होता तर ईतर जण एम.एच 06 बी.ई 7695 क्रमांकाच्या ईनोव्हा कार मध्ये बसून पिकअपच्या पुढे राहुन पोलीसांवर पाहरा ठेवते.पिंपळनेर पोलीसांनी ईनोव्हा कारचा पाठलाग करुन ईनोव्हा पकडली मात्र त्यातील जुबेर अन्सारी,वसीम अन्सारी,सोनु विधाते व सचिन मुर्दाडकर पळुन गेले तर प्रियकिर्ती पगारे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

ईनोव्हा कार,पिक अप,विमल पान मसालासह 39 लाख 40 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करत दोघांना ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप सोनवणे, भाईदास मालचे,प्रविण अमृतकर,विशाल मोहने,चेतन सोनवणे,सोमनाथ पाटील, मकरंद पाटील, रवींद्र सुर्यवंशी आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: