
बातमी कट्टा:- गुरे तस्करांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.अवैध गुरांची वाहतूक सुरु असतांना रात्रीच्या पोलिसांनी कारवाई केली होती यावेळी अचानक गुरे तस्करांनी अंधाराचा फायदा घेत दगडफेक केली. यात गुरांना गोशाळेत नेण्यासाठी आलेला आयशर चालक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सिमालगत गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती.त्या माहिती नुसार गोरक्षक व धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ताजी शिंदे यांच्या पथकासह शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पदक दि 15 रोजी रात्रीच्या सुमारास पळासनेर जवळील परिसरात 60 गुरांची सुटका केली.सर्व गुरांना शिरपूर तालुक्यातील वाडी येथे असलेल्या नवकार गोशाळेत पाठविण्याबाबत करण्याबाबत आदेश करण्यात आल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि एलसीबी पोलिस निरीक्षक दत्ताजी शिंदे हे धुळ्याकडे रवाना झाले.
यानंतर दोन वाहनांमधून या गुरांना पोलिसांच्या मदतीने गोशाळेत घेऊन जाण्याची कारवाई सुरु होती.एका वाहनात गुरे गोशाळेसाठी रवाना करण्यात आली होती.मात्र दुसरे आयशर वाहन गुरे घेण्यासाठी पोहचले असता. घटनास्थळावर अचानक दगडफेक सुरु झाली.अंधाराचा फायदा घेत दगडफेक झाल्यानंतर पोलिसांकडून प्रतिकार करण्यात आला.यादरम्यान दगडफेकीत गोशाळेत गुरे नेण्यासाठी आलेल्या चालक गंभीर जखमी झाला त्याच्यावर शिरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर शिरपूर तालुका पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.