बातमी कट्टा:- घटस्फोट शिवाय दुसरा विवाह करणाऱ्या पतीसह विवाह करुन देणारे वकील ,त्या विवाहात साक्ष देणारे दोन साक्षीदारांसह 17 संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या पत्नीचा छळ करून तिचे दागिने काढून घेतल्यानंतर दुसरे लग्न करण्यात आल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे.
22 वर्षीय महिलेचे वसीम अय्युब सय्यद रा.शहापूर जि.बर्हाणपूर,मध्यप्रदेश याच्याशी विवाह झाला होता.मात्र तिच्या पतीसक्ष संशयितांनी तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केला.पतीला नोकरी व वाहन घेण्यासाठी माहेरून दहा लाख आणावेत अशी तिच्याकडे मागणी करण्यात आली.तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने काढून घेत माहेरी पाठवून दिले.घटस्फोट न देता दुसऱ्या महिलेशी विवाह करून घेतला.असल्याची फिर्याद शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संशयित पती वसीम अली,अय्युब अली,नुजहय सय्यद,शफिका सय्यद ,मोहसीन सय्यद,शफिका सय्यद , अशिया सय्यद सर्व रा.शहापूर मध्यप्रदेश, गुलजान पटवे, जावेद पटवे रा.पिंप्राळा जळगाव,अमजद सय्यद, फरहत, नईमा,जुल्फीकार पटवे,इफ्तेखार पटवेहारून पटेवे, यांच्यासह विवाह करून देणारे दोन वकील व दोन साथिदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.