बातमी कट्टा:- दोंडाईचा शहरातील डी जी नगर, नंदुरबार रोड येथील रहिवासी अनिल गोराणे यांच्या घरी काल दि १८ रोजी सायंकाळच्या ८ वाजेच्या सुमारास घरफोडी करून एक लाख साठ हजार रुपये रोख रक्कम व तीन ते चार तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली.पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करण्यात आली.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की डी जी नगर मध्ये राहणारे गोराणे हे कंपनीचे टीव्ही रिपेरिंग चे नंदुरबार जिल्हा मॅनेजर आहेत त्यांची पत्नी रोटरी स्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, मागेच कोरोना काळात त्यांचे आई-वडील त्यांचा स्वर्गवास झाला, त्यांची पत्नी गणपती सणानिमित्त मुंबई येथे गेले असता व अनिल गोराणे हे आपल्या कामावर नंदुरबार गेले ते गेले असता चोरट्यांनी संधी साधून काल दि.१८ रोजी सायंकाळी साडेसात ते आठ च्या सुमारास संधी साधून एक व्यक्ती बाजूच्या घराजवळ व्हाईट कलर च्या मोपेड गाडीवर बसून होता व काही अज्ञात चोरांनी गेट मधून मधल्या मुख्य दरवाजाचा पितळी कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील दोन लोखंडी कपाट फोडून त्यातील रोख एक लाख 60 हजार रुपये व चार ते पाच तोळे जुने सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. सायंकाळी ऑफीसहून आल्यानंतर अनिल गोराणे हे रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या समोर दरवाजा व पूर्ण घर उघडे असल्याचे दिसले त्यांनी आत बघितले तर सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेले आढळले व दोन्ही कपाटे फोडलेले, तिजोरी तोडलेले दिसले त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले व पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर पाहणी केली व दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास श्वान पथक आणून चोरट्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, पोलीस निरिक्षक दुर्गेश तिवारी, स पो नि संतोष लोले यांनी घटनास्थळी भेट दिली.