बातमी कट्टा:- घरासमोर असलेल्या उकीरडा काढावा अन्यथा आठ दिवसांत तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

शिरपूर तालुक्यातील दहिवद गावात गवळी वाडा श्रीकृष्ण मंदिर येथील ग्रामस्थांनी काल दि १५ रोजी ग्रामस्थांना निवेदन दिले.निवेदनात म्हटल्यानुसार येथील घरांसमोर कित्येक वर्षांपासून उकीरडा असल्याने परिसरातील लोकांना त्याचा त्रास होतो.ग्रामपौचायत कार्यालयाला वेळोवेळी तक्रारी करूनही दखल घेत नसून सरपंच आणि ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत.

या उकीड्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफाईड सारख्या विविध आजारांचा ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे.यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत चौकशी करुन तात्काळ कारवाई करावी अन्यथा येत्या आठ दिवसांत तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.निवेदनावर ईश्वर भटु गवळी,अमोल नागोजी गवळी,अक्षय नागोजी गवळी, रवींद्र भेटू गवळी,भेटू महादू गवळी,भगवान धाकलू गवळी यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
