
बातमी कट्टा:- मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून चोरी झालेली क्रुझर वाहनाचा पोलीसांनी शिताफीने शोध घेत मध्यप्रदेश राज्यातून ताब्यात घेतले आहे.याबाबत सांगवी पोलीस सँटेशनात गुन्हा दाखल होता.

शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील दिपक पवार यांच्या मालकीची एम एच १७ एजे १९०० क्रमांकाची क्रुझर वाहन घरासमोर नेहमीप्रमाणे उभी असतांना दि २९ मार्च रोजी रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेरी होती.दिपक पवार हे सकाळी उठल्यावर बघितले असता क्रुझर गाडी चोरी झाल्याचे लक्षात त्यांच्या आल्याने त्यांनी सर्वदूर शोधाशोध केली परंतु क्रुझर वाहन मिळुन आली नाही अखेर शिरपूर तालुका पोलीसांना याबाबत माहिती देत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरपूर तालुका पोलीसांंकडून याबाबत शोध सुरु होता. पोलीसचे एक पथक तयार करून मध्यप्रदेश राज्यात रवाना करण्यात आले होता.यावेळी तपास सुरु असतांनाच मध्यप्रदेश राज्यात एक ठिकाणी बेवारस पणे चोरीला गेलेली क्रुझर वाहन आढळून आले.पोलीसांनी ते वाहन ताब्यात घेत कारवाई नंतर सांगवी येथील दिपक पवार यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
