बातमी कट्टा:- रोजंदारी वरील पद स्वयंपाकी ऐवजी सफाईगार असे आदेश काढल्याने ते कामाठी किंवा स्वयंपाकी असे नव्याने आदेश बदलून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात एकुण दहा हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने साहाय्यक प्रकल्प अधिकारीला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.विशेष म्हणजे सदर लाच चक्क शौचालयात घेतल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता.
मिळालेल्या माहिती नुसार नाशिक जिल्ह्यातील कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत तक्रारदार यांचे पत्नीचे रोजंदारीने सफाई कर्मचारी पदाऐवजी स्वयंपाकी पदावर नियुक्ती करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप नागनाथराव वडजे वय 54 याने दि 5 रोजी लाचेची मागणी केली होती.त्या आधारे तक्रादाराने लाचलुचपत विभागाला तक्रार दिल्याने दि 29 रोजी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता.दि 29 रोजी शौचालयात दहा हजारांची लाच स्विकारतांना सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.सदर लाच प्रताप वडजे यांनी चक्क शौचालयात स्विकारल्याने सर्वत्र चर्चेला उधान आले होते.सदरची कारवाई सापळा अधिकारी वैशाली पाटील, पोलीस उपअधीक्षक,पो.नि.जाधव,राजेश गीते,शरद हेंबाडे, संतोष गांगुर्डे आदींनी केली आहे.