बातमी कट्टा:- आज दिनांक 14 रोजी चांदपुरी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक माजी मंत्री तथा विधान परिषद आमदार अमरीशभाई पटेल शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा,माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे,नगरसेवक अशोक बापू कलाल,वनावल गटाचे जिल्हा परिषद सदस्य भरत भिलाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणुक पार पडली.
चांदपुरी वि.का सोसायटीच्या चेअरमन पदी महेंद्र लिलाचंद पटेल तर व्हाईस चेअरमन पदी अर्जुन बाजीराव पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर संचालक पदी राजधर हरी पाटील,भूपेंद्र सुभाष पटेल, रघुनाथ शंभू पटेल, किशोर छगन पटेल, विमलबाई रघुनाथ पटेल, ज्योती तुकाराम पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
यावेळी चांदपुरी गावातील विलास पटेल, अशोक पटेल, सुरेश पटेल,दत्तू पटेल, शरद पटेल, हरी पटेल, भावेश पाटील, संजय पटेल,अंबालाल पटेल, कैलास पाटील, किरण पटेल, सचिन पटेल व ग्रामपंचायत सदस्य सुनिता विलास पटेल व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सर्व नवनिर्वाचित चेअरमन,व्हाईस चेअरमन तथा संचालक मंडळाचे शाल,श्रीफळ व फुलहार देऊन सत्कार करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. व्ही. पवार यांनी काम पाहिले, संस्थेचे सचिव जयवंत लोटन साळुंखे यांनी परिश्रम घेतले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य लिलाचंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले व अविनाश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.