चाकूने भोसकून तरुणाचा खून

बातमी कट्टा:- किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली असून संशयित घटनास्थळावरुन पसार झाला आहे. गावातील मुलाला का मारले याचा जाब विचारल्याने दोघांमध्ये झालेल्या वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावातीलच प्रविण उर्फ मोन्या राजू सोनवणे ह. मु. बायपासरोड चाळीसगांव याने खरजई गावातील पिंन्टू शिंदे या तरुणास मारहाण केली होती.त्याला मारहाण का केली याचा जाब विचारण्यासाठी सतिष साहेबराव सोनवणे वय-32 रा. बेघरवस्ती खरजई हा तरुण प्रविण उर्फ मोन्या सोनवणे याचेकडे गेला असता रात्रीच्या सुमारास सतिष सोनवणे आणि प्रविण उर्फ मोन्या यांच्यात वाद निर्माण झाले.प्रविण सोनवणे आणि सतिष सोनवणे यांच्यात झटापट सुरु असतांनाच प्रविण सोनवणे याने खिशातील चाकु काढून सतिषच्या पोटात वार केले. घटनास्थळावरुन संशयित प्रविण सोनवणे फरार झाला.जखमी अवस्थेत सतिष सोनवणे याला चाळीसगांवी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून सतिष सोनवणे यास मृत घोषीत केले.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: