चारीत्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून…

बातमी कट्टा:- चारीत्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीवर दगडाने वार करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नष्ट करण्याच्या हेतून मृतदेह ओढत शेतातील कपाशी पिकांच्या आढोश्याला टाकला.संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले असून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील येथील रविंद्र ठोबा पावरा(43) हा त्याची पत्नी मंगीबाई रविंद्र पावरा(40) हिला सोमवारी सायंकाळी लक्कडकोट ते तलावडी रस्त्यावर चिरडे शिवारातील चिंध्या तुंबड्या पावरा यांच्या कपाशीच्या शेतात घेवून गेला. तिथे त्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून मारहाण केली. बुक्क्यांनी मारहाण करीत,दगडाने डोक्यावर, कपाळावर, डाव्या डोळ्यावर गंभीर जखमा करून जीवे ठार मारले. खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह त्याच कपाशीच्या शेतात सुमारे साठ ते सत्तर फूट ओढत नेले . याबाबत लक्कडकोटचे पोलीस पाटील सखाराम शंकर पावरा यांनी फिर्याद दिल्यानुसार म्हसावद पोलीसात भादवी कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: