चालती बस रस्त्याच्या बाजूला खड्यात जाऊन उलटली…

बातमी कट्टा:- रस्त्यावर चालत असतांना बसचा तोल गेल्याने रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन महामंडळाची बस एकाबाजूने उलटल्याची घटना काल दि 25 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने यात जिवीतहानी टळली तर चार जण जखमी झाले आहे.

काल दि 25 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास सोनगीर अमळनेर महामंडळाची एम.एच 18 बी.एल.1418 क्रमांकाची एस.टी बस वाघाडी वलखेडा – रस्त्यावर जात असतांना वालखेडा गावानजीक महामंडळाची बस रस्त्याच्या बाजूला खड्यात जाऊन एकाबाजूने बस उलटल्याची घटना घडली आहे.बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटल्याचे सांगितले जात आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच ग्रामस्थांनी घटनास्थळावरधाव घेऊन मदतकार्य केले यात महिलेसह तीन ते चार प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

WhatsApp
Follow by Email
error: