चालत्या बसला अचानक आग…

व्हिडीओ बातमी

बातमी कट्टा:- ऐन घाटात शहादा मुंबई परिवहन महामंडळाची बसने अचानक पेट घेतलायात संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र संपूर्ण बसने पेट घेण्याआधी बसचालक व वाहकाने समयसूचकता दाखवत बसमधील ३२ प्रवासींना बसमधून खाली उतरवले.यामुळे मोठी जिवीतहानी टळली.

On YouTube

काल दि १८ रोथी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास शहादा येथून मुंबई जाणाऱ्या एम एच २० डीएल ४१२८ क्रमांकाच्या बस चांदवड जवळील राहुड घाट चढत असतांना म्हसोबा मंदिराच्या जवळ चढावर बसला अचानक आग लागली.धुर येत असल्याचे लक्षात आल्याने चालक व वाहकने बसमधील सर्व प्रवाशींना बसच्या खाली उतरवले.व त्यानंतर काही क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी टोल कंपनीचे पथक दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले यावेळी वाहतूक कोंडी झाली होती.पोलीसांनी शर्तीचे प्रयत्न करत वाहतूक सुरळीत केली .चालक आणि वाहकाच्या समयसूचकता मुळे मोठी जिवीतहानी टळली.

WhatsApp
Follow by Email
error: