बातमी कट्टा:- चालत्या बुलेटला अचानक आग लागल्याची घटना घडली असून या आगीत चालक जखमी झाला तर बुलेट जळून खाक झाल्याची घटना आज दि 28 दुपारच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 28 रोजी शहादा शिरपूर रस्त्यावर शहादा येथे राहणारे प्रकाश तिरमले हे एम एच 18 एटी 4545 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या बुलेटने शिरपूरच्या दिशेने जात असतांना अनरद बारी फाटा जवळ बुलेटने अचानक पेट घेतला या आगीत प्रकाश तिरमले भाजले गेल्याने उपस्थितीतांनी बुलेट चालकाला शहादा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.या आगीत संपूर्ण बुलेट जळून खाक झाली आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी सारंगखेडा पोलीस दाखल झाले होते.