बातमी कट्टा:- शेतातील काम आटोपून वडीलांच्या मालवाहू ४०७ वाहनाने घरी येत असतांना वाहनाच्या खाली पडल्याने 17 वर्षीय मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दि 4 रोजी दुपारच्या सुमारास घडली.अंगावर पाल पडल्याने घाबरुन तोल जाऊन दोन्ही तरुणी पडल्याने एकाचा मृत्यू तर एक तरुणी गंभीर असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अमळनेर तालुक्यातील भिलाली (बेटावद) येथील दिलीपसिंग आनंदसिंग राजपूत हे दि 5 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास आपल्या ४०७ या मालवाहू वाहनाने शहापूर भिलाली रस्त्याने आपल्या भाची व मुलीसोबत शेताचे काम आटोपून घरी येत असतांंना दिलीपसिंग राजपूत यांची मुलगी जान्हवी दिलीप राजपूत वय 16-17 व भाची ताऊ हे दोन्ही तरुणी मालवाहू वाहनाच्या मागे बसलेले असतांना अचानक अंगावर पाल पडल्याने जान्हवी व ताऊ दोन्ही तरुणी घाबरून गेल्याने त्यांचा तोल जाऊन त्या डांबरी रस्त्यावर खाली पडल्या.
दोन्ही मुलींना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतांना जान्हवी दिलीप राजपूत हिचा मृत्यू झाला तर पिऊ हिच्यावर धुळे येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. मयत जान्हवी राजपूत ही बेटावद येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी विद्यालयात 11 वीचे शिक्षण घेत होती.