बातमी कट्टा :- वेळेचे महत्व ओळखून या व्यासपीठावर सर्व पक्षीय नेत्यांना विराजमान केले.चिपी विमानतळ उदघाटन कार्यक्रम प्रमाणे सर्व पक्षांना एका मंचवर बोलवले.80 टक्के समाजकारण व 20टक्के राजकारणाच्या माध्यमातून गावासह परिसराचा विकास होऊ शकतो हे मिलींद पाटील यांनी दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांनी केले.शिरपूर तालुक्यातील हिंगोणी बु.येथे जलशुद्धीकरण संयत्र(आर.ओ)प्लांट लोकार्पण सोहळा व हिंगोणी गावात शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांचा नागरिक सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
आज दि 14 रोजी सकाळी 10 वाजता हिंगोणी बु.येथे हिंगोणी ग्रामपंचायत व ग्रा.म.सदस्य मिलींद पाटील यांच्या नेतृत्वात जलशुद्धीकरण संयत्र लोकार्पण सोहळा व आरोग्य विभागाचे नागरीक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे,उदघाटक म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे व विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ जितेंद्र ठाकूर उपस्थित होते. डॉ तुषार रंधे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी भाषणात बोलतांना म्हणाले की,गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्य हे सर्व पुढार्यांकडे जाऊन विकास कामांची मदत मागत असतात.गावाच्या समस्यांसाठी संघर्ष करतांना दिसतात.गावाच्या विकासासाठी आम्ही नेहमी सोबत आहोत. आरोग्य विभागाच्या सर्व टिमचे अभिनंदन,हिंगोणी गाव प्रमाणेच परिसर देखील शंभर टक्के केव्हा होईल याकडे लक्ष द्यावे असे यावेळी डॉ तुषार रंधे यांनी सांगितले.
जलशुद्धीकरण संयत्र (आर.ओ) प्लांटचे उदघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांनी केले यावेळी ते बोलतांना म्हणाले की मिलींद पाटील यांनी वेळेचे महत्त्व ओळखून जि.प.अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांना निमंत्रीत केले,चिपी विमानतळ कार्यक्रम प्रमाणे पालकमंत्री जरी आमचे शिवसेनेचे असले तरी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या देखील मदतीची गरज आहे.
पालकमंत्री शिवसेनेचे असले तरी मात्र चावी जि.प.अध्यक्ष यांच्याकडे असतात.80 टक्के समाजकारण करणे या भावणेने शिवसेनेने आजतोवर समाजकारण केले.मिलींद पाटील देखील 80 टक्के समाजकारण करत आहेत यामुळे त्यांनी शिवसेने पक्षात यावे यासाठी निमंत्रीत करु ,या परिसरात शिवसेना वाढण्यासाठी मदत होईल,मिलिंद पाटील हे दुर दृष्टी ठेऊन सर्व पक्षीय नेत्यांना घेऊन विकासकाम करत आहेत यामुळे मिलींद पाटीलांनी शिवसेना पक्षात प्रवेश करावा असे निमंत्रीत जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या भाषण दरम्यान सांगितले की,राजकारण करत असतांना समाजकारण हाच दृष्टीकोण ठेवावा, राजकारण हे समाजसेवेचे साधन आहे. याचा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व विकासासाठी फायदा घ्यावा,मात्र काही जण राजकारणातून स्वताचे घर भरण्याचे कामे करत असतात.आपल्या खिशातून कोणाला पैसे द्यायचे नाही तर जनेतेचा पैसा जनतेपर्यंत पोहचवावा असल्याने प्रामाणिक प्रयत्न करावा,मिलिंद पाटील हे हिंगोणी बु.गावाच्या विकासासाठी त्यांच्या आरोग्यासाठी जलशुद्धीकरण संयत्र बसवले गावाच्या विकासासाठी आमच्या परीने मदत करु असे आश्वासन यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी दिले.
गावाच्या प्रस्ताविक दरम्यान हिंगोणीचे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील म्हणाले की, चिटी विमानतळ उदघाटनाया धर्तीवर हिंगोणी बु.येथे देखील सर्व पक्ष एका मंचावर बोलवले आहे.गेल्या 20 वर्षात नेहमीच 20 टक्के राजकारण व 80 समाजकारण केले यामुळे गावाच्या विकासासाठी सर्वांकडून कामे मिळण्यास मदत होत आहे.गावातील जनतेचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शुध्द पाणी मिळावे हाच यामागील प्रामाणिक प्रयत्न आहे.गावात आठ वेळा कँम्प राबवून हिंगोणी बु.गाव शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाले.यासाठी आरोग्य विभागाची मोलाची मदत लाभली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा उपप्रमुख भरतसिंग राजपूत,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिरीष पाटील,जि.प.सदस्य देवेंद्र पाटील, सरपंच हिसाळे रामेश्वर पाटील, हिंगोणी सरपंच नानाभाऊ पाटील, पंचायत समिती सदस्य निंबा पाटील, राष्ट्रवादी नेते रमाकांत पाटील,माजी.पं,स सदस्य रामकृष्ण महाजन,शिवसेनेचे तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा ,शिवसेना शहर प्रमुख देवेंद्र पाटील, शिवसेनेचे हिंम्मत महाजन,आरोग्य केंद्र वाडी मेडिकल ऑफीसर डॉ संदिप गिरासे,आरोग्य साहाय्यक गुलाब निळे आदी जण उपस्थित होते.कार्यक्रमासाठी परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.