जयंतीनिमित्त “हिताशी” ने रेखाटले राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंहजी यांचे सुंदर चित्र….

बातमी कट्टा:- राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्ताने दहावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीने राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंहजी यांचे चित्र रेखाटून एक अगळे वेगळे अभिवादन केले आहे.जयंतीनिमित्त महापुरुषांचे चित्र रेखाटून ती महापुरुषांना अभिवादन करण्याचा तीचा छंद जोपासत आहे.

राष्ट्रपुरुषांच्या जयंती निमित्त जो तो आपल्या परिने जयंती साजरी करत असतो.अशाच पध्दतीने महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी दहावीचे शिक्षण घेणारी हिताक्षी बब्रुवाहन गिरासे हि ज्या महापुरूषांची जयंती असेल त्या महापुरुषांचे सुंदर चित्र रेखाटतून या पध्दतीने अभिवादन कर असते.

हिताक्षी बब्रुवाहन गिरासे हीचे मुळ गांव शिंदखेडा तालुक्यातील तामथरे असून ती सध्या शिरपूर येथे वडील बब्रुवाहन नारायणसिंह गिरासे,आई अंजली गिरासे व भाऊ वेदांत गिरासे यांच्यासह राहते.वडील शेतीसह मेडीकलचा व्यवसाय करतात.तर आई गृहिणी तर भाऊ इयत्ता 8 वीत शिक्षण घेत आहे.   

हिताश गिरासे हिला बालपणापासूनच चित्रकलेची आवड आहे.वर्गमैत्रिणींमुळे इयत्ता 7 ते 8 वी पासून शिरपूर रंगरेषा आर्ट येथे चित्रकलेचे शिक्षण घेण्यास तीने सुरुवात केली. रंगरेषा आर्ट & पेंटिंग क्लासेसचे भूषण मांडे सर व अतुल बारी सर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: