बातमी कट्टा:- धुळे तालुक्यातील धनुर-तामसवाडी शिवारातील खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आलेला नाला यंदा पावसाच्या पहिल्याच टप्प्यात पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला आहे.जवाहर ट्रस्टमार्फत झालेल्या या कामाची कमाल पाहून शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे.आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टमार्फत राबविण्यात आलेल्या सिंचन चळवळीचे अनेक बंधारे तुडूंब भरून वाहू लागले तर खोलीकरण व रुंदीकरण केलेले नालेही खळखळून वाहू लागले आहेत.

माजी कृषी व पाटबंधारे मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या मार्गर्शनाखाली आणि धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व संकल्पनेतून धुळे तालुक्यात गेल्या 11 वर्षापासून नाला व बंधारे खोलीकरणाची चळवळ राबविण्यात येत आहे. माथा ते पायथापर्यंत नदी नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करुन वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले आहे.धुळे तालुक्यात सुमारे 102 गावात तब्बल 400 हून अधिक बंधार्यांचे खोलीकरण-रुंदीकरण करण्यात आले आहे.ज्यामुळे आज 7 हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होत आहे.कन्हेरी नदी, वाघी नदी, पांझरेवरील फड बंधारे, विविध पाझर तलावांचे पुनर्जीवन करुन तालुक्यातील सिंचन चळवळीला गती मिळाली आहे. धुळे तालुक्यातील धनुर तामसवाडी शिवारातील खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आलेल्या नाला यंदा पावसाच्या पहिल्याच टप्प्यात पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला आहे.या नाल्याचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ.कुणाल पाटील यांनी जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टकडून खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते.या कामामुळे धनुर, कापडणे, तामसवाडी या गावातील सुमारे 150 शेतकर्यांच्या शेतीला लाभ मिळत आहे. या शेतकर्यांच्या विहीरींची पाण्याची पातळी उंचावली असून विहीरी तुडूंब भरल्या आहेत.त्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ होवून उत्पन्न वाढल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान धनुर येथील चेतन शिंदे, अशोक पाटील, हिरामण चौधरी, कैलास शिवाजी पाटील, शांतूभाई पटेल,साहेबराव कोळी,संभाजी शिंदे परमेश्वर पाटील, प्रकाश गुजर आदी शेतकर्यांनी पाण्याने भरुन वाहणार्या नाल्याला भेट दिली व आ.कुणाल पाटील यांनी केलेल्या सिंचनाच्या कामामुळे आज आमच्या शेतातील विहीरी पाण्याने तुटूंब भरल्या असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
सिंचनाला प्राधान्य-आ.कुणाल पाटील
धुळे तालुक्यात माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या संकल्पनेला गती देत मी नेहमीच सिंचनाच्या कामांना प्राधान्य दिले आहे.शेतकरी सुखी झाला तर तालुका समृध्द होवू शकते, त्याकरीता जवाहर ट्रस्टची सिंचन चळवळ प्रभावीपणे राबवित असतो.आज त्याचा शेतकर्यांना फायदा होतांना दिसत असून याचा मला मनस्वी आनंद आहे.यापुढेही ही चळवळ अशीच सुरु ठेवत धुळे तालुका शंभर टक्के बागायती करण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया आ.कुणाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.