
बातमी कट्टा:- अवैध वाळू वाहतूकीने शिरपूर तालुक्यातील जातोडे बोरगाव परिसरात हैदोस घातला आहे. सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक सुरू असतांना देखील याकडे महसूल विभाग पुर्णता दुर्लक्ष करतांना दिसत आहे.

दोन वर्षांपूर्वी शिरपूर तालुक्यातील जातोडे येथे भरधाव अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने महिलेला चिरडल्याची घटना घडली होती.यासह अनेकदा अवैध वाळू वाहतूकीमुळे जातोडे बोरगाव परिसरात वाहतूक करणाऱ्यांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असतो.काही दिवसांपासून जातोडे बोरगाव परिसरात पुन्हा अवैध वाळु वाहतूक करणाऱ्यांनी कहर केला आहे. विशेष म्हणजे याकडे महसूल विभागाकडून देखील पुर्णता दुर्लक्ष होतांंना दिसत आहे.या वाळू वाहतूकीमुळे दोन वर्षापूर्वी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.यामुळे या गंभीर घटनेकडे महसूल विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा पुन्हा या अवैध वाहतूकीमुळे परिसरात मृत्यूला आमंत्रण दिले जात आहे.