बातमी कट्टा:- कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरली नसतांआच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लस चा मोठ्याप्रमाणात प्रसार होण्याची भिती लक्षात घेता धुळे जिल्ह्यासह राज्यातील नंदुरबार, नागपूर, वाशीम,अकोला या पाच जिल्ह्यातील आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या 19 जुलै रोजी होणाऱ्या पोटनिवडणूकांना आता स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या 5 जिल्ह्यातील पोटनिवडणूका दि 19 होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.मात्र कोरोना व डेल्टाप्लस सह कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती लक्षात घेता.या पोटनिवडणूकांना आता स्थगिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या पोटनिवडणूकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आला असतांना आता मात्र निवडणूकांना स्थगिती मिळाल्याने इच्छुक उमेदवारांकडून नाराजीचा सुर उमटत आहे.