बातमी कट्टा:- अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात धुळे जिल्हा कारागृहात जेलबंद असलेल्या संशयित कारागृहातून फिल्मी स्टाईलने फरार झाला होता.अखेर पोलिसांनी दोन तासात संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी अर्जुन आव्हाड हा धुळे न्यायालयीन कोठडीत असतांना आज दि 29 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास कारागृहातील शोचालयाच्या खिडकीतून उडी मारुन अर्जून आव्हाड हा संशयित काही सेकंदात कारागृहातून फरार झाला होता. याबाबत धुळे शहर पोलीसांना माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग सुरु केला यावेळी शहरातील सत्यसाईबाबा कॉलनीत अर्जुन आव्हाड हा दिसून आला पोलिसांना बघुन अर्जून आव्हाड घरांच्या छतावरून उड्या घेत पळू लागला.यावेळी धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी नकाणे रोडवरील महादेव मंदीराजवळ अवघ्या दोन तासात शिताफीने पुन्हा त्याला ताब्यात घेतले आहे.
