ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कडून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन!!

बातमी कट्टा:- ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी ता.शिरपूर जि.धुळे (महाराष्ट्र) यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ” गुरु स्मृतिदिन निमित्त”ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.गुरुजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग 12 वर्षांपासून अविरतपणे उपक्रमातून कुरखळी गावचे नाव लौकिक करणारा  ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान
व गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रमशील काम करणाऱ्या शिक्षकांना दि 12 सप्टेंबर 2023 या दिवशीच्या ‘ज्ञानदिपक आदर्श शिक्षक पुरस्कार”सन्मान सोहळ्यात ट्रॉपी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून शिरपूर तालुक्यातील ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी या संस्थेच्या वतीने दिला जाणार मानाचा ” ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार” साठी सर्व शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

सदर प्रस्तावातुन उपक्रमशिल शिक्षकांच्या निवड करण्यासाठी ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानकडून निवड समिती गठीत करुन आलेल्या पुरस्कारांची छाननी करून खालील प्रमाणे पुरस्कार देण्यात येतील.
व्यवस्थापन निहाय पुरस्कार खालील प्रमाणे असतील
🔹 जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन :- पुरस्कार संख्या दोन
🔸 नगरपालिका व्यवस्थापन शाळा :- पुरस्कार संख्या एक
🔹 खाजगी प्राथमिक व खाजगी माध्यमिक व्यवस्थापन शाळा :- पुरस्कार संख्या दोन
🔸 इंग्रजी व्यवस्थापन शाळा :- पुरस्कार संख्या एक
🔹 खाजगी तथा शासकीय आश्रम शाळा व्यवस्थापन :- पुरस्कार संख्या एक
🔸 उर्दू व्यवस्थापनाच्या शाळा :-पुरस्कार संख्या एक
🔹 तालुक्यातून क्रीडा आदर्श शिक्षक पुरस्कार:-पुरस्कार संख्या एक
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याची अंतिम दिनांक:- 5.9.2023 दुपारी 1 वाजेपर्यंत असेल

तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी ऑफलाइन प्रस्ताव फाईल खालील दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधून वेळेत सादर करावेत

अध्यक्ष व सचिव
ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी तालुका शिरपूर जिल्हा धुळे
योगेश्वर मोरे- 97674 66230
मनोहर वाघ- 9763236070
संस्थेकडून एक लिंक देण्यात आली आहे त्यांवर क्लिक करून पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत

https://forms.gle/nR4roAkWBgMm8BRn8

WhatsApp
Follow by Email
error: