बातमी कट्टा:- रविवारी मध्यरात्री अज्ञात संशयिताने कृरतेने डोक्यात धारदार शस्त्राने 55 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.झोपेत असतांना त्यांचा डोक्यात त्यांचा खून करण्यात आला होता.सोमवारी सकाळी घटना उघडकीस आली आहेत.
जळगाव राजू पंडीत सोनवणे वय 55 हे जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवनसमोर त्यांची आई धृपताबाई आणि पुतण्या विशाल सोनवणे सोबत राहतात. रविवारी रात्री राजू सोनवणे घरी आले होते.रात्री राजू यांनी जेवण केले व राजू सोनवणे रात्री घराच्या वरील मजल्यावर झोपायला गेले. त्यांची आई व पुतण्या खालच्या खोलीत झोपले होते. सोमवारी सकाळी 8.30 वाजले तरी राजू सोनवणे झोपेतून उठून खाली आले नाहीत. म्हणून त्यांचे कुटुंबीय वरच्या खोलीत पाहायला गेले असता राजू सोनवणे यांच्या डोक्यावर अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने वार केले असल्याचे दिसून आले.अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता.
राजू सोनवणे यांची हत्या कोणी व का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही.मात्र यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाला असावा असा पोलीसांकडून संशय व्यक्त केला जात असून पोलीसांकडून याबाबत तपास सुरु आहेत.