टायर फुटल्याने दोन्ही पुलांच्या मध्यभागी ट्रक पलटी…

बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर धुळेकडून शिरपूर कडे जाणाऱ्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने नरडाणा येथील दोन्ही पुलांच्या मध्यजागी ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे.सुदैवाने जिवीतहानी टळली.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर धुळेकडून शिरपूरकडे ट्रक जात असतांना अचानक टायर फुटला यामुळे ट्रक नरडाणा येथील रेल्वे पुलाजवळील दोन्ही पुलाच्या मध्यभागी जाऊन ट्रक पडला.सुदैवाने पुलाच्या सुरवातीला घटना घडल्याने दोन्ही पुलाच्या मध्यभागी पडल्याने ट्रकची मोठी दुर्घटना टळली आहे.सुदैवाने जिवीतहानी टळली.

WhatsApp
Follow by Email
error: