ट्रान्सफार्मवर काम करतांना विजेच्या झटक्याने वायरमनाचा मृत्यू….

बातमी कट्टा:- विजेच्या ट्रान्सफार्मरचे काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना 8 फेब्रुवारी 2022 मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील एसबीआय बँक लगत असलेल्या काही भागातील विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सुनिल शिवदास गवळी २३ रा. झेंडेअंजन त्यांच्यासह सोबत असलेले वायरमन यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे 8 फेब्रुवारी रोजी दैनंदिन काम सुरु होते. दरम्यान सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास एसबीआय बँक लगत असलेल्या विजेच्या वायरमन सुनील गवळी डिपीवर चढून आपले काम करीत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरु झाला आणि क्षणार्धात त्यांना काही कळायच्या आत विजेचा जोरदार झटका बसल्याने ते खाली जमिनीवर कोसळले.वायरमन सुनील गवळी यांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. डॉ अमोल जैन यांनी तपासून सुनील गवळी यांना मयत घोषित केले.याप्रकरणी लखन गुसिंगे यांनी तालुका पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: