ट्रॅव्हल्सचा अपघात,१५ प्रवासी जखमी,एकाची प्रकृती चिंताजनक

बातमी कट्टा :- गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेश कडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकाचा नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सचा भिषण अपघात झाला असून अपघातात 15 प्रवासी जखमी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या सुरत खरगोन बसचा शहादा शहरातील 132 केवी सब स्टेशन जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन 15 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शहादा शहरातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने आणि प्रवाशांनी मदतीची याचना करण्यासाठी गोंगाट केल्याने स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी मदतीसाठी धाव घेतली पलटी झालेल्या बसमधून प्रवाशांना मदतकार्य करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: