बातमी कट्टा:- रंगपंचमीच्या दिवशी दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत यातील एकाची प्रकृती गंभीर असून धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील साक्री शहरामध्ये डिजे वाजवण्यावरून दोन गटामध्ये वाद निर्माण झाला.या वादात तुफान हाणामारी झाली यात तीन जण जखमी झाले आहेत.त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर अन्य दोघांवर साक्री येथेच उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली तर धुळे येथून वरीष्ठ पोलीसांसह पथक दाखल झाले आहेत.या प्रकरणी उशिरापर्यंत कारवाई सुरु होती.प्राथमिक माहिती नुसार दुपारी डिजे वाजण्यावरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे.साक्री शहरात आता तणावपूर्ण शांतता आहे.
