
बातमी कट्टा:- डॉ जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष नामांकनपत्र दाखल केले. यावेळी त्यांच्या शक्तीप्रदर्शनात हजारोंची संख्या बघायला मिळाली असून या शक्तीप्रदर्शनाच्या मिरवणूकीत तरुण मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.विशेष म्हणजे नामांकन पत्र दाखल करतांना महिलांंच्या सन्मानासाठी महिलांच्या उपस्थितीत डॉ जितेंद्र ठाकूर यांनी नामांकनपत्र दाखल केले.

महाविकास आघाडी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षाला शिरपूर विधानसभा जागा सुटेल अशी शक्यता वर्तवली जात होती.यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते डॉ जितेंद्र ठाकूर यांचे नाव चर्चेत होते मात्र दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीकडून शिरपूर विधानसभा ची जागा कम्युनिस्ट पक्षाला देण्यात आल्याने डॉ जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
डॉ जितेंद्र ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. अध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील डॉ जितेंद्र ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश केल्याचे डॉ ठाकूर यांच्याकडून सांगण्यात येत होते.मात्र अचानक शिरपूर विधानसभा कम्युनिस्ट पक्षाला सुटल्याने डॉ जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
