बातमी कट्टा:- पोळा सणाच्या दिवशी भरदिवसा चिमठाणे जवळील महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील डॉ प्रेमसिंग गिरासे या तरुणाचा धारधार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली होती.घटनेच्या काही तासांत खलाणे गावातील तीन संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. पोलीसांकडून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु असतांना आता पोलीसांनी तो चाकू व नवीन मोटरसायकल संशयिताच्या सासरवाडीतून ताब्यात घेतले आहे.
पोळा सणाच्या दिवशी दराणे येथील डॉ प्रेमसिंग राजेंद्र गिरासे हा तरुण शिंदखेडा तालुक्यातील पाटण चौफुली येथून नवीन प्लाटीना मोटरसायकल आणत असतांना चिमठाणे सोनगीर मार्गावर तीन संशयितांनी भरदिवसा चाकूने वार करून खून केला होता व नवीन मोटरसायकल घेऊन संशयित पसार झाले होते. घटनेच्या काही तासातच पोलीसांनी शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील शाम मोरे,राकेश मोरे, राकेश पवार या तिघांना ताब्यात घेतले होते.तिघांना शिंदखेडा मा.न्यायालयात हजर केले असता दि 11 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.याप्रकरणी पोलीसांकडून सखोल चौकशी सुरु असतांना पोलीसांनी श्याम मोरे या संशयिताने माळीच येथील सासराच्या घरात लपवून ठेवलेला चाकू तर माळीच शिवारातील तलावाच्या काठालगत असलेल्या खड्ड्यात ठेवलेली मोटरसायकल पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.याबाबत पोलीसांकडून चौकशी सुरु आहे.