डॉ.व्ही.व्ही.रंधे स्कूलमध्ये सर्वसामान्यांच्या रूपात वावरणाऱ्या नवदुर्गांचा सत्कार

बातमी कट्टा:- किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ. विजयराव व्यंकटराव रंधे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शिरपूर येथे नवरंग विजयउत्सवानिमित्ताने सर्वसामान्यांच्या रुपात वावरणाऱ्या नवदुर्गांचा शोध घेऊन नवरंग विजयोत्सव स्त्रीशक्तीचा जागर या कार्यक्रमात कोरोना काळातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या नवदुर्गा यांचा सत्कार सोहळा आदरणीय आशाताई रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरपूर वरवाडे न.प. चे नगरसेवक रोहित बाबा रंधे हे होते. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. नीता सोनवणे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांनी केले.याप्रसंगी आपले कुटुंब सांभाळत कोरोना काळात जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस निरीक्षक छाया पाटील ,डॉ.नीतू बत्रा डॉ. नीलिमा देशमुख, डॉ.नीता सोनवणे,भारती ठाकरे( बँक शाखाधिकारी)शुभांगी ठाकूर (लाईन मन) प्रीती पाटील(वाहतूक निरीक्षक) कावेरी परदेशी(पत्रकारिता) गायत्री कापडे(शिक्षक) यांना नगरसेवक रोहित बाबा रंधे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुळातच महिला ही कधी अबला न होती.भारत हा नवदुर्गेची पूजा करणाऱ्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीशक्ती चा सहभाग असतो. आणि हे केवळ शालेय जीवनात अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित केल्यास महिला सक्षम होण्यास मदत होते.

असे प्रतिपादन शिरपूर पोलीस निरीक्षक छाया पाटील यांनी यावेळी केले. तर डॉ. नीता सोनवणे यांनी शाळेच्या वाढता प्रगतीचा आलेखाचे कौतुक करून संस्था व शाळेप्रति कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी माता पालकांची विद्यार्थिनींचे गरबा नृत्य स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम दामिनी बडगुजर द्वितीय मोनिका पाठक तृतीय मोनिका कुमावत तर मुलींच्या गटात प्रथम आम्रपाली खर्चाने, निर्मिती पाटील द्वितीय गौतम जैन ,महिमा चव्हाण तृतीय प्रिया शर्मा साक्षी चौधरी यांना अनुक्रमे मा रोहित बाबा रंधे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे परीक्षण प्रीती बाफना यांनी केले.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या कामिनी पाटील सारिका,प्रा. प्रकाश बारी, प्रा. एस टी ठाकरे, प्रा. आर के पाटील उपस्थित होते. कार्यक्रमा चे आयोजन शाळेच्या संचालिका हर्षालिताई रंधे ,समन्वयक जी व्ही पाटील ,शाळेचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर प्रमोद पाटील यांनी केलं. तर सांस्कृतीक प्रमुख समाधान राजपूत , वंदना पांडे ज्योती देशमुख वंदना पाटकरी स्वाती चव्हाण उमेश राजपूत यांनीकार्यक्रम व्यशस्वितेसाठी प्रयत्न केले.तर सूत्रसंचालन शगुफ्ता मंसुरी यांनी व आभार सुरेखा चौधरी यांनी केले.

WhatsApp
Follow by Email
error: