बातमी कट्टा:- राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मान्यतेने व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित दिनेशराव मोरे,रा.कुरखळी ता.शिरपूर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांचा गौरव केला.

सुमित मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व सध्याचे विधानसभा क्षेत्रीय अध्यक्ष दिनेश मोरे यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत.सुमितने एम बी ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून माऊली ऍग्रो प्रोजेक्ट अंतर्गत वॉटर बॉटल च्या व्यवसायात यशस्वीरीत्या अनुभव घेत आहेत.या नियुक्तीमुळे मान्यवरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
