
बातमी कट्टा:- शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील युवक राजू सोमा शिंदे यांनी मला मोफतचे रेशन नको असे निवेदन शहादा तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना देऊन प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचा माझा पुरवठा थांबवावा अशी मागणी केली आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मा.प्रधान मंत्री यांनी गरीब जनते साठी कोरोनाच्या काळात प्रधानमंत्री जनकल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य वितरण सुरू केले ते आज पर्यंत सुरू आहे याचा लाभ मी ही घेतला आहे परंतु आता मी काम कष्ट करून माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकतो या मोफत च्या धान्य मिळतंय म्हणून माझ्यातील आळस जागी होतोय म्हणून माला या पुढे प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचे मोफत चे धान्य नको,

शासनाच्या रेशन दुकानामार्फत विकत वितरित करण्यात येणारे धान्य मी शासन दर प्रमाणे खरेदी करून घेईल माझ्या या मोफत च्या धान्य सोडल्याने कुना गरीबास ते मिळु शकेल एक सुजाण नागरिक म्हणून मोफत धान्य घेणं हे काही योग्य वाटत नाही तरी मोहदय यांनी माझ्या गरीब कल्याण योजनेचा कोटा थांबवावे अशे आशयाचे निवेदन शहादा तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
