
बातमी कट्टा:- मोटरसायकली(स्कुटी) वर आलेल्या तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि 26 रोजी सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास घडली होती. आज दि 27 रोजी सकाळी त्या तरुणाचा मृतदेह तापीनदीत आढळून आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 27 रोजी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावरून तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.सदर तरुण जि.जे 05 एस,एक्स 7157 क्रमांच्या निळ्या रंगाच्या मोटारसायकल (स्कुटी) वरून सावळदे तापी नदी पुलावर आला व तेथून त्याने तापी नदीत उडी घेतली होती.पुलाच्या विरुध्द दिशेला तापी पुलावरील कठड्याचे काम सुरु होते.घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. नरडाणा पोलीसांनी सदर स्कुटी (मोटरसायकल ) ताब्यात घेतली होती.सदर स्कुटी शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील छोटु गोरख कोळी या 33 वर्षीय तरुणाची असल्याचे कळाल्यानंतर त्याचा सावळदे तापी नदीत शोध सुरु होता.आज दि 27 रोजी सकाळच्या सुमारास छोटु गोरख कोळी या तरुणाचा तापीनदीत मृतदेह मिळुन आला. मच्छीमार करणाऱ्या बोटीतून मृतदेह बाहेर काढत मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.छोटु गोरख कोळीने आत्महत्या का केली ? याबाबत माहिती मिळु शकलेली नाही.मृत छोटु कोळी याच्या पश्चात आई,वडील,पत्नी 1 मुलगा 1 भाऊ 1 बहिण असा परिवार होत.