तापी नदीत मोठा भाऊला वाचविण्यासाठी गेलेला लहान भाऊच पाण्यात बुडाला,उशिरापर्यंत शोधकार्य सुरु…

बातमी कट्टा:- आजोबांच्या दशक्रिया विधीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी तापी नदीकाठावर गेलेल्या दोन भाऊ तापी पात्रात वाहून जात असताना एकाला वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश मिळाले मात्र एकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरुच होता.

व्हिडीओ वृत्तांत

शहादा,प्रकाशा मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील रविंद्र सामुद्रे यांचे वडीलांचे दशक्रिया विधीसाठी नातेवाईकांसमवेत रवींद्र सामुद्रे केदारेश्‍वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या स्मशान भूमीजवळ तापी नदी किनारी गेले होते.यावेळी रविन सामुद्रे यांचा मोठा मुलगा गौतम सामुद्रे व लहान मुलगा राज सामुद्रे हे दोघेही मुंडन केल्यानंतर आंघोळीसाठी तापीनदी किनारी पाण्यात आंघोळीसाठी उतरले. यावेळी गौतम सामुद्रे याचा अचानक पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला.त्याच्या सोबत असलेला लहान भाऊ राज सामुद्रे मोठा भाऊ गौतमला वाचविण्यासाठी नदीत उडी मारली.परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने राज सामुद्रे वाहुन गेला. यावेळी तापीनदीच्या पात्रात मच्छिमारांनी उडी टाकत गौतम सामुद्रे यास पाण्यातुन बाहेर काढत उपचारासाठी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.तसेच लहान भाऊ राज सामुद्रे याचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु मिळुन आला नसून त्याचा उशिरापर्यंत शोध सुरु होता.

व्हिडीओ वृत्तांत
WhatsApp
Follow by Email
error: