तापी नदीत युवकाची आत्महत्या

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील वरुळ २४ वर्षीय युवकाने तापी नदीपात्रात उडी घेतल्याची घटना आज रविवारी सायंकाळी घडली असून रात्री ९ वाजेच्या सुमारास मृतदेह मिळून आला आहे.पवन छगन मराठे वय २४ रा.वरूळ असे युवकाचे नाव आहे.


तालुक्यातील वरूळ येथील पवन छगन मराठे वय २४ याने सायंकाळी ५:३०वाजेच्या सुमारास सावळदे येथील तापी नदी पुलावर मोटारसायकल उभी करून तापी नदी पुलावरून रवीवारी ११ जुलै रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास उडी घेतली दरम्यान त्याचा पट्टीच्या पोहणाऱ्यांमार्फत तापी नदी पात्रात शोध घेण्यात आला असता रात्री ९वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आल्याने मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. डॉ.आहेर यांनी तापसणी करून पवन मराठे यास मयत घोषित केले.दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून अधिक माहिती घेतली आहे. मृतदेह सापडे पर्यंत मित्रमंडळी व नातेवाईक घटनास्थळी थांबून होते.याप्रकरणी पुढील कारवाई उशिरापर्यंत सुरू आहे

WhatsApp
Follow by Email
error: