बातमी कट्टा:- तापी नदीपात्रात उडी घेऊन 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दि 29 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली असून कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावाजवळील दलवाडे येथील प्रदिप धुडकु कोळी वय 28 याने दि 29 रोजी शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.मय प्रदिप कोळी यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार प्रदिप कोळी याचे कौटुंबिक वाद असल्याने दि 29 रोजी नंदुरबार येथील महिला सेल येथे गेला होता.तेथून तो दुपारी घरी दलवाडे येथे आला.तेथून तो गिधाडे तापीपुलावर येऊन त्याने तापी नदीपात्रात उडी घेतली. आत्महत्यापूर्वी प्रदिप कोळी याने नातेवाईकांना फोन वर आत्महत्या करत असल्याचे कळविले होते.त्याला थांबवण्यासाठी नातेवाईकांनी धाव घेतली मात्र त्यापुर्वीच प्रदिप कोळी याने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.नदीपात्रात त्याचा शोध घेतला असता दि 29 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.मयत अवस्थेत प्रदिप कोळी याला शिंदखेडा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौटुंबिक वादातून प्रदिपने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून शिंदखेडा पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.


