बातमी कट्टा:- तापी नदी पुलावर महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी शिरपूर व शिंदखेडा पोलीस दाखल झाले असून सदर महिलेची ओळख पटू शकली नाही.महिलेने आत्महत्या केली किंवा हा घातपाताचा प्रकार असून मृतदेह अन्यत्र ठिकाणावरून पुलावर आणला असावा याबाबत चर्चा सुरू आहे.
आज दि 5 रोजी सकाळी गिधाडे तापी नदी पुलावरील कठड्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.सदर मृत महिलेची ओळख पटू शकलेली नसून महिलेने आत्महत्या केली किंवा हा घातपाताचा प्रकार असून मृतदेह अन्यत्र ठिकाणावरून पुलावर आणला असावा याबाबत चर्चा सुरू आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीस पाटील दाखल होत सदर घटनेची माहीती पोलीसांना देण्यात आली यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पथक आणि शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले असून चौकशी करण्यात येत आहे.