बातमी कट्टा:- मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे नदीपुलावरून तापीत उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज दि 9 रोजी दुपारी घडली आहे. याबाबत नदीत तरुणाचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 9 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर एम.एच 18 बी क्यु 7593 क्रमांकाची मोटरसायकल आढळून आली.सदर मोटरसायकलीवर आलेल्या तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून शोध घेण्यात येत आहे.
मोटरसायकल ओळखीमुळे तापी पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. तापी नदीपात्रात तरुणाचा शोध घेण्यात येत आहेत.