बातमी कट्टा: पोटाच्या लेकरापेक्षा जास्त जिव लावलेल्या गाय आणि वासरुचा आगीत होरपळून मृत्यू झाला.गुरांच्या झोपडीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने झोपडी जळून खाक झाली. डोळ्यासमोर गाय आणि वासरुचा मृत्यू बघतांना वृध्द आजी आणि आजोबांनी हांबरडा फोडला,दोघेही जण रडत असल्याचे बघून उपस्थित जनसमुदाय गहीवरला.वृद्ध आजी आणि आजोबांचे गावकऱ्यांनी सांत्वन केले.

धुळे तालुक्यातील आर्णी येथील शेतकरी बाबुलाल माळी यांच्या शेतातील झोपडीत नेहमीप्रमाणे एक गाय आणि वासरु बांधलेले असतांना ते सकाळी चारा पाणी करण्यासाठी गेले त्यावेळी झोपडीला आग बघितले आणि घामच फुटला. त्यांनी गावकऱ्यांना हाक मारत बोलवले मात्र यावेळी झोपडीत असलेल्या गायीचा आणि वासराचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता तर संपूर्ण झोपडी जळून खाक झाली होती.घटनास्थळी ग्रामस्थ दाखल होऊन पाणी टाकत आग विझविण्यात आली.ही आग अचानक न लागता कोणीतरी लावली असावी अशी शंका यावेळी उपस्थित झाली.शेतकरी बाबुलाल माळी यांचे या गायीवरच सर्व उदरनिर्वाह होता.जिवापाड प्रेम करून गायीला आणि वासराला आजी आजोबांनी सांभळले होते.यावेळी संपूर्ण दृश्य बघून आजी आजोबांनी हांबरडा फोडला.
आजी-आजोबा रडत असल्याचे दृश्य बघून उपस्थित जनसमुदाय ही गहिवरला नागरिकांनी आजी आणि आजोबांचे सांत्वन करत शांत केले.प्रशासनाकडून यांना मदत मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे.