
बातमी कट्टा:- तीन बालकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर पिंजऱ्यात कैद करण्यात आले आहे.धुळे तालुक्यातील बोरी क्षेत्रात नरभक्षक बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आज पहाटेच्या सुमारास पकडण्यात आलेला हा बिबट्या नरभक्षकच आहे याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यातील बोरी परिसरातील क्षेत्रात नरभक्षक बिबट्या मानवी रक्ताला चटावला होता.या नरभक्षक बिबट्याने एकुण तीन बालकांचा बळी घेतला.यानंतर या नरभक्षक बिबट्याला तातडीने ताब्यात घेण्याची मागणी येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती.याबाबत वनविभागाचे आणि पुणे येथील संस्थेच्या पथकाकडून या नरभक्षक बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.याबाबत बोरी परिसरात पिंजरे व कॅमेरे लावण्यात आले होते.मात्र काही दिवसांपासून हुलकवाणी देत नरभक्षक बिबट्या कॅमेरा व पिंजऱ्यात देखील आढळून आला नव्हता.
आज पहाटे साडेपाच वाजेला बेशुद्ध करत बिबट्याला जेरबंद करण्यात आले.बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याची माहिती परिसरात पसरताच परिसरामध्ये सुटकेचा निस्वास घेतला.पिंजऱ्यात कैद केलेल्या बिबट्याला मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ अन्य ठिकाणी हलवल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पकडला गेलेला बिबट्या हा नरभक्षकच आहे का? याबाबत स्थानिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे.या नरभक्षक बिबट्याने एक आठवड्यात तीन बालकांचा बळी घेतला होता.