बातमी कट्टा:- पाटचारी जवळील बेवारस स्थितीत आढळलेल्या इरटीगा कारमधून पोलीसांनी ६ लाख ९२ हजार ४५० रुपये किंमतीचा मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या अफू सदृश्य बोंडे आढळून आली आहेत. पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील आर्वी ते शिरूड चौफुली रस्त्यावरील मोघण गावाचे शिवारातील पाटचारी जवळ एम एच १२/युएफ ८५६० क्रमांकाची इरटीगा कार बेवारस स्थितीत आढळून आली होती.याबाबत मोहाडी पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी त्या इरटीगा कारची तपासणी केली असता त्यात ६ लाख ९२ हजार ४५० ,रूपये किंमतीची अफू सदृश्य पिकाची बोंडे आढळून आलीत.याबाबत पोलीसांनी मोहाडी नगर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी कारसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.