“त्या” मृतदेहाची ओळख पटली…! बलात्कार करून खूनाचा संशय… चार संशयित ताब्यात…

बातमी कट्टा:- दि 11 रोजी निमझरी नाका परिसर जवळील गणपती मंदीराच्या मागच्या बाजुला असलेल्या नाला जवळील झाडाझुडपांमध्ये एका मुलीचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली होती.आता त्या प्रकरणात मुलीवर लैगिंक अत्याचार करून तिचा तिन संशयितानी खून केल्याच्या संशयावरुन तीच्या वडीलांनी गुन्हा दाखल केला आहे.आज घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक यांच्यासह पोलीस पथक झाले होते याबाबत पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

काय घडले होते ?

दि 11 रोजी एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता.घटनास्थळी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे पोलीस पथकासह दाखल झाले होते.यावेळी तेथील झाडाझुडपांमध्ये मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.मृतदेहाची चौकशी करुन मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.यावेळी पोलिसांनी त्या घटनास्थळी सर्वत्र पाहणी व चौकशी केली.दि 10 रोजी शिरपूर येथील 18 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. बेपत्ता झालेल्या मुलीच्या आई व वडीलांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात बोलवून मिळालेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा तो मृतदेह त्यांच्याच मुलीचा असल्याचे उघड झाले.पोलिसांनी मृतदेहाला धुळे येथे शवविच्छेदनासाठी पाठविले.

वडीलांनी दिलेली माहिती

दि 8 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आपल्या 18 वर्षाची मुलगी 5 रुपये घेऊन किराणा दुकानात कुरकुरे घेण्यासाठी गेली मात्र ती परत आली नाही.तीचा परिसरात शोध घेतला रात्रीभरात देखील ती घरी परतली नाही.दि 9 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुलीच्या मैत्रीणीकडे तिचा शोध घेतला मात्र तेथे देखील मिळुन आली नाही.

शोध घेत असतांना आशिर्वाद हॉस्पिटल चौकात बबलु याने तुमची मुलगी मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अहिल्या लॉन्सच्या रस्त्यावर तिच्या मैत्रीणीसह एका मुलासोसबत दिसले होते असे सांगितले.

त्यावरून वडील व त्यांचा भाचा असे पुन्हा तीच्या मैत्रीणीच्या घरी गेले व तु खोट का बोललीस अस तीला विचारले यावर दोन्ही सोबतच असतांना तीला भेटण्यासाठी रविंद्र (दादु) पावरा हा आला असल्याचे सांगितले होते.मुलगी कुठेही मिळुन आली नाही म्हणून वडीलांनी दि 10 रोजी शिरपूर पोलीस स्टेशनात मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली.

दि 11 रोजी वडीलांना पोलिसांनी देवमोगरा कॉलनी जवळील नाल्या जवळ असलेल्या झाडा झुडपांमध्ये मुलीचा मृतदेह मिळुन आला आहे.शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असुन प्रत्यक्ष बघुन ओळख पटवून घ्या असे सांगितले.तेव्हा मृतदेह बघितला असता तो मृतदेह त्यांच्या मुलीचाच असल्याची ओळख पटली,मृतदेह शवविच्छेदन साठी धुळे पाठविण्यात आले.तीचा मृतदेह बघितला तेव्हा तीच्यावर अत्याचार करुन गळाला कशाने तरी फास लावून तीचा खून केला असल्याचा वडीलांना संशय आला.

याबाबत तिच्या मैत्रणीला विचारले असता ती रविंद्र (दादु)कोकणी रा.रामसिंग नगर शिरपूर याच्या सोबत होती आणि,क्रिष्णा पावरा रा.रामसिंग नगर,सुरेश पावरा रा.नाथनगरी कॉलनी शिरपूर हे पण होते असे सांगितले यावरून रवींद्र कोकणी,क्रिष्णा पावरा व सुरेश पावरा यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तीचा खून केल्याचा संशय असल्याने त्यांच्या विरूध्द शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या संशयितांना घेतले ताब्यात..

आज घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक दाखल झाले होते.पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी रविंद्र कोकणी, क्रिष्णा पावरा व सुरेश पावरा या तिघांसह आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणात आणखी कुणाचे धागे दोरे लागतात का ? दि 8 पासून ते दि 11 पर्यंत बेपत्ता होती यावेळी ती कुठे होती याबाबत पोलीसांकडून शोध सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: